सोलापूरच्या उदय कुलकर्णींच्या व्यवसायाला भरारी; 'अमृत पर्यटन' नोंदणीमुळे मिळाला नवा मार्ग !
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेऊन स्थानिक उद्योजक आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक उदय जयंत कुलकर्णी यांनी 'अमृत पर्यटन' अंतर्गत आपली अधिकृत नोंदणी केली होती. या नोंदणीमुळे त्यांच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. अमृत प्रबोधिनीच्या मार्गदर्शनामुळे आणि योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे व्यवसायात सकारात्मक बदल घडून आल्याचे उदय कुलकर्णी यांनी सांगितले. व्यवसायाला नवीन ओळख आणि गती मिळवून दिल्याबद्दल त्यांनी 'अमृत' प्रबोधिनीचे व व्यवस्थापनाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.अमृत संस्थेच्या विविध योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील नवउद्योजकांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे या उदाहरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग,
तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क:- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment