२२ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग
नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या नांदेड कार्यालयात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षणवर्गाचा (ईडीपी) प्रारंभ झाला. सरस्वतीपूजन व दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन झाले आणि त्यानंतर ओमकार ध्यान करण्यात आले. २२ प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले आहेत.
या वेळी नांदेडमधील प्रसिद्ध उद्योजक अमर नेरलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रशिक्षक रोहन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अमृतसखी सौ. मनीषा कुनसावळीकर, अमृतमित्र प्रशांत कापसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
नवीन व्यवसाय सुरू करणे, तसेच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर यामध्ये मार्गदर्शन केले जात आहे. उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग व ट्रेडमार्क नोंदणी यांसह शासकीय योजनांचा उद्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत यात तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment