अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची दिली ग्वाही
अकोला : नुकत्याच झालेल्या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले नीलेश देव यांचा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी नीलेश देव यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या समाजकार्याला यश लाभावे, तसेच त्यांच्या कार्यातून शहराच्या विकासाला गती मिळावी, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी झालेल्या संवादात दिली. अकोला शहर व परिसरातील गरजू, दुर्लक्षित व वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment