ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण आणि अमृत पर्यटन उपक्रमातून स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी

अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांचे प्रतिपादन

ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण आणि अमृत पर्यटन उपक्रमातून स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी  मुख्य फोटो
ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण आणि अमृत पर्यटन उपक्रमातून स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी  अतिरिक्त फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण आणि अमृत पर्यटन यांसारख्या या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या माध्यमातूनदेखील युवक-युवतींसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन अमृत अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी केले. अमरावतीत सुरू असलेल्या स्वयंरोजगार उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिल्यावर ते प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधत होते. 'केवळ पारंपरिक पद्धतीने रोजगारनिर्मितीकडे न बघता, 'अमृत'मार्फत खुल्या होणाऱ्या नवनवीन योजनांचा लाभ समाजाने घ्यावा,' असे आवाहन त्यांनी केले.

प्रवीण कोळेश्वर यांनी ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, 'ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण अल्पकालीन आहे. त्यातून युवकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये मिळतात. कुंभमेळा, जत्रा, धार्मिक यात्रा यांसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये ड्रोनद्वारे लाइव्ह व्हिडिओ कव्हरेज, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा निरीक्षण, माहितीपट निर्मिती यासाठी मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे पंढरपूर, शेगाव, तुळजापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट अशा विविध तीर्थक्षेत्रांमध्ये पर्यटन ड्रोन सेवांचा वापर वाढत आहे. पर्यटनस्थळांचे प्रमोशनल व्हिडिओ, सोशल मीडिया रील्स, डॉक्युमेंटेशन यासाठी प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर्सना भरपूर संधी उपलब्ध आहेत.'

'स्थानिक गाइड सेवा, ड्रोन फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी, इव्हेंट कव्हरेज, डिजिटल कंटेंट निर्मिती यामधून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. ग्रामीण व निमशहरी भागातील युवकांनी हे प्रशिक्षण घेतल्यास ते रोजगार देणारे बनू शकतात,' असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी कोळेश्वर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने ठाम पावले टाकण्याचे आवाहन केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 330 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 330 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words