कुशाल जैन यांना देण्यात आली सविस्तर माहिती
अहेरी (गडचिरोली) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्यासाठी संस्थेतर्फे विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. अमृत संस्थेचे गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी यांनी सहायक जिल्हाधिकारी कुशाल जैन यांची अहेरी येथे भेट घेतली. त्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांबद्धल माहिती देण्यात आली. अमृत संस्था काय आहे, ती कशी कार्य करते याबद्दल त्यांनी जाणून घेतले. या योजना लाभार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त करून, त्यांनी अमृत संस्थेच्या कार्याला पाठिंबा व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment