भिवापूरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती

अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या गाठीभेटी

भिवापूरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती मुख्य फोटो
भिवापूरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांविषयी जनजागृती अतिरिक्त फोटो

भिवापूर (जि. नागपूर) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांनी भिवापूर येथे महत्त्वपूर्ण भेटीगाठी घेतल्या. त्या वेळी भिवापूर गावातील लक्ष्यित गटातील इच्छुक लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. उपस्थित लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योजकता विकास कार्यक्रम, तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

उपस्थितांनी अमृत संस्थेच्या उपक्रमांविषयी उत्सुकता दाखवून विविध प्रश्न विचारले. अधिकाधिक युवक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, उपव्यवस्थापक प्रतीक आकरे, अमृतमित्र निखिल देशपांडे या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमातून भिवापूर परिसरातील इच्छुक लाभार्थ्यांना अमृत संस्थेबाबत स्पष्ट माहिती मिळाल्याने आगामी काळात संस्थेच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 04:47 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 04:47 PM News publication time | Views: 115 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words