शिर्डीमध्ये सुरू होतोय अमृत ग्लॅमर प्रशिक्षण कार्यक्रम

प्रशिक्षणाआधी घेण्यात आली बैठक

शिर्डीमध्ये सुरू होतोय अमृत ग्लॅमर प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
शिर्डीमध्ये सुरू होतोय अमृत ग्लॅमर प्रशिक्षण कार्यक्रम अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : शिर्डीमध्ये अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण अंतर्गत अमृत ग्लॅमर अर्थात प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट होण्यासाठीचे प्रशिक्षण येत्या सोमवारपासून (२६ जानेवारी) चालू होणार आहे. त्या निमित्ताने अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी शिर्डी येथे सर्व इच्छुक प्रशिक्षणार्थी महिलांची एकत्रित बैठक घेतली. या वेळी अमृतमित्र शरद क्षीरसागर व प्रशिक्षिका श्वेता कुलकर्णी उपस्थित होत्या. सागर भोपे यांनी सविस्तर माहिती दिली. दर्जेदार प्रशिक्षण घेऊन यशस्वी व्यावसायिक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:18 PM News publication time | Views: 489 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 23-01-2026 News publication date | Time: 10:18 PM News publication time | Views: 489 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words