यवतमाळच्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये अमृत संस्थेच्या योजनांचे प्रभावी सादरीकरण
यवतमाळ : 'अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून ही संस्था उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी बळ देते. त्यामुळे उद्योगांबरोबरच उद्योजकही प्रगतिपथावर वाटचाल करत राहतात. त्यामुळे या योजनांचा लाभ घेऊन लक्ष्यित गटाने आपली प्रगती साधावी आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा,' असे प्रतिपादन अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांनी केले. यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये अमृत संस्थेचे विशेष सत्र झाले. त्यात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील विविध समाजांतील व्यावसायिक, उद्योजक व नवउद्योजकांना अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
ही कॉन्फरन्स यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक मंडळांसाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उपस्थित व्यावसायिकांना अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण योजना, अमृतपेठ, वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना आदींची माहिती देण्यात आली. या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी, तसेच आर्थिक बळकटी मिळवण्यासाठी अमृत संस्था कशा प्रकारे मदत करते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील नामवंत उद्योजक मनोज व्यास उपस्थित होते. या कार्यक्रमाला अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नागपूर विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर व यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचे मनापासून कौतुक केले. या योजना व्यवसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून, व्यवसायवृद्धीसाठी प्रभावी ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमृत संस्थेच्या योजना व उपक्रम व्यवसायिकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यात आले. या सत्रामुळे जिल्ह्यातील व्यावसायिकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याविषयी स्पष्ट दिशा मिळाली असून, उद्योजकतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मोबाइल : ९११२२२७६३३
पत्ता : यवतमाळ जिल्हा कार्यालय
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए–१, अवधूतवाडी,
तिवारी चौक, यवतमाळ – ४४५ ००१
ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment