नांदेडमध्ये 'बीबीएन'च्या प्रदर्शनात 'अमृतपेठ'चा जागर

उद्योजकांपर्यंत पोहोचली अमृत संस्थेच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची माहिती

नांदेडमध्ये 'बीबीएन'च्या प्रदर्शनात 'अमृतपेठ'चा जागर मुख्य फोटो
नांदेडमध्ये 'बीबीएन'च्या प्रदर्शनात 'अमृतपेठ'चा जागर अतिरिक्त फोटो

नांदेड : ब्राह्मण बिझनेस नेटवर्क अर्थात 'बीबीएन'च्या नांदेड शाखेतर्फे मकर संक्रांतीनिमित्त नांदेड शहरातील अंबिका मंगल कार्यालयात विविध उद्योजकांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला अमृतसखी सौ. मनीषा कुनसावळीकर यांनी भेट दिली. त्यांनी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती तेथे दिली. अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमृत संस्थेने तयार केला असून, त्याच्या माध्यमातून किफायतशीरपणे आपली उत्पादने ऑनलाइन विकणे उद्योजकांना शक्य होणार आहे. या प्लॅटफॉर्मविषयी सौ. कुनसावळीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अमृत संस्थेची दिनदर्शिकाही भेट म्हणून देण्यात आली. 

बीबीएन नांदेड ही संस्था दर वर्षी तीन वेळा स्वतः उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवते. यातून स्थानिक उद्योजकांना नवे व्यासपीठ मिळाले असून, प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

Publisher: Manisha Kunsavlikar News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 66 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Manisha Kunsavlikar News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 11:56 AM News publication time | Views: 66 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words