योजनांबद्दल व्यक्त केले समाधान
अहिल्यानगर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील ब्राह्मण समाजातील महिलांची अमृत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला १५ ते २० महिलांची उपस्थित होत्या. या वेळी सर्व महिलांना अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषत: अमृत कौशल्य व अमृतपेठ या विषयावर जास्त भर देण्यात आला. मोबाइल फिल्म मेकिंग, अमृत आरीवर्क, अमृत ब्युटी पार्लर, अमृत इमिटेशन ज्वेलरी, अमृत अन्नपूर्णा, अमृत बेकरी या कोर्ससंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला सौ. राजश्री क्षीरसागर, सुनीता देशपांडे, रजनी कुलकर्णी, द्वारका कुलकर्णी, वैभवी कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, अलका कुलकर्णी, विदुला कुलकर्णी, वैशाली देशमुख, करुणा कुलकर्णी, मंदाकिनी आडकर, स्वाती फडणीस, शर्मिला जोशी आदी महिलांची उपस्थिती होती.
अमृत संस्थेच्या योजनांबाबत उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले आणि अमृत संस्थेचे आभार मानले.
अधिक माहितीसाठी
पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर - 414003
संपर्क क्रमांक : 9112228769
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment