नवउद्योजकांना व्यवसायविस्तारासाठी सुवर्णसंधी - अमृतपेठ

अमृत संस्थेचा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि जोडीला अन्य साह्यकारी योजना - याविषयी माहिती देणारा अमृत संस्थेचे निबंधक सिद्धेश्वर वरणगावकर यांचा लेख

नवउद्योजकांना व्यवसायविस्तारासाठी सुवर्णसंधी - अमृतपेठ मुख्य फोटो
नवउद्योजकांना व्यवसायविस्तारासाठी सुवर्णसंधी - अमृतपेठ अतिरिक्त फोटो

अमृत महाराष्ट्र ही शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. आपल्या लक्ष्यित गटाला सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांची उन्नती करण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातून अधिकाधिक उद्योग उभे राहिले, तर राष्ट्राची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला व्होकलफॉर लोकल हा मंत्र दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील छोट्या उद्योजकांना आपले उत्पादन केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विकता आले पाहिजे असा विचार अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केला. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन मार्केटिंगचा उपयोग करण्याचे ठरवले आणि पाहता पाहता उद्योजकांसाठी अमृतपेठ असे नाव असलेली बाजारपेठ त्यांनी सुरू केली.

आज वस्तूंच्या विक्रीसाठी अनेक ऑनलाइन म्हणजेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. परंतु तेथे विक्री करायची झाल्यास कमिशनदेखील भरमसाठ म्हणजे जवळपास ४० टक्के द्यावे लागते. ही रक्कम उद्योजकांना नाईलाजास्तव द्यावी लागते. एवढी मोठी रक्कम कमिशनच्या रूपात द्यावी लागू नये म्हणून विजय जोशी यांनी स्वतः लक्ष घालून उद्योजकांसाठी अमृतपेठ या नावाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये आता उद्योजकांची नोंदणी सुरू झाली आहे.

युवक-युवतींना नवा उद्योग सुरू करायचा असेल; पण कोणता उद्योग सुरू करावा हे लक्षात येत नसेल, तर अमृत कौशल्य उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील अमृत संस्थेचे व्यवस्थापक त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या आवडीच्या उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करतात. या नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय सहज सुरू करता यावा म्हणून त्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचे हप्तेदेखील अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेतून दिले जातात. त्यामुळे उद्योजकांना बँकेकडून दोन वर्षे कर्ज बिनव्याजी उपलब्ध होते असे म्हणता येईल. उद्योजक हुशार असेल, तर तो दोन वर्षांतच कर्जाची रक्कम पूर्णपणे भरून आपला व्यवसाय भक्कम करू शकतो. म्हणजेच अमृत कौशल्य, वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना व अमृतपेठ अशा तिन्ही योजना परस्परपूरक असल्याचे आपणास पाहायला मिळते. नवउद्योजकांनी याचा फायदा करून घेतला, तर निश्चितपणे त्यांचा आणि पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष होईल.

युवक युवतींना मी एवढेच सांगेन, की

उठना है और भी उपर

है उँचाईयाँ पुकारती

है अपार क्षमाताएँ

आशायें तुम्हे निहारती

- सिद्धेश्वर वरणगावकर,

निबंधक, अमृत, पुणे

.......

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी मांडलेली भूमिका वाचा पुढील लिंकवर...https://amrutmaharashtra.org/news.php?id=133

अमृतपेठ उपक्रमाविषयी अधिक वाचा पुढील लिंकवर...https://amrutmaharashtra.org/news.php?id=160

अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com

अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)

अमृतपेठ कोणासाठी उपयुक्त आहे? :https://amrutmaharashtra.org/news.php?id=261

अमृतपेठ हा किफायतशीर प्लॅटफॉर्म वापरायचा कसा? :https://amrutmaharashtra.org/news.php?id=285

अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने आणि कॅटेगरी कशा द्यायच्या? :https://amrutmaharashtra.org/news.php?id=324


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 16-01-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 4,508 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 16-01-2026 News publication date | Time: 03:31 PM News publication time | Views: 4,508 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 3 Comments

H
Harshika Sharma
17-01-2026 05:51 PM

Bahoot acha platform he is par apne products kese sell kare please guide kijiye baki acha kam he sarahniya he isse chote udhyog ko badhava milega

R
Ravindra chobe
17-01-2026 05:13 PM

Fantastic opportunity to all entrepreneur i hope every body powerful

V
Vijay Joshi
16-01-2026 04:03 PM

अतिशय चांगली संकल्पना मांडलेली आहे.
अमृतपेठ या विषयावर वरणगावकर साहेबांनी लेखमाला सुरू करावी जेणेकरून अमृत पेठ मधील लहान सहान बारकावे सर्वांना कळतील....

Write a Comment
0 / 50 words