अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने आणि कॅटेगरी कशा द्यायच्या?

विक्रेत्यांसाठी मार्गदर्शन; लेखमालेचा तिसरा भाग

अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने आणि कॅटेगरी कशा द्यायच्या? मुख्य फोटो
मुख्य फोटो

राज्यातील लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर जगभर पोहोचवण्यासाठी अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अलीकडेच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. अमृतपेठ या प्लॅटफॉर्मविषयी अधिक माहिती देणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग...
...........

अनेक विक्रेत्यांना वाटतं, की आपण आपली उत्पादने किंवा सेवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करू शकणार नाही; पण अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अत्यंत सोपा आणि वापरण्यास खूप सुलभ आहे. त्यामुळे त्यावर आपली उत्पादने (Products) किंवा सेवा (Services) उपलब्ध करणं हे एखादा फॉर्म भरण्यासारखंच सोपं आहे.

Product/Service अपलोड करण्याची पद्धत पाहू या.
- विक्रेता (Seller) म्हणून login करा
- डाव्या बाजूला असलेल्या products/services या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Add New Product/service या बटणावर क्लिक करा.
- Product/Service याचं नाव, किंमत आणि माहिती लिहा.
- Product/Serviceची कॅटेगरी (Category) निवडा. (Select)
- उत्पादनाचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
- त्या उत्पादनाचा किती स्टॉक (Stock) उपलब्ध आहे, ते नमूद करा
- शिपिंग कॉन्फिगरेशन्स (Shipping configurations) अर्थात शिपिंगचे पर्याय किंवा त्या संदर्भात विचारलेली माहिती लिहा.
- त्यानंतर Upload product/service या पर्यायावर क्लिक करा.

कॅटेगरी (Category) म्हणजे काय आणि ती का महत्वाची?

कॅटेगरी म्हणजे उत्पादनाचा प्रकार, उदा. खाद्यपदार्थ, हस्तकला, कपडे, घरगुती वस्तू, इत्यादी.

योग्य कॅटेगरी निवडल्यामुळे ग्राहकांना तुमचं प्रॉडक्ट पटकन सापडतं. त्यामुळे विक्रीची शक्यता वाढते.

योग्य माहिती + योग्य category = जास्त विश्वास

........

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी मांडलेली भूमिका वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=133

अमृतपेठ उपक्रमाविषयी अधिक वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=160

अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com

अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)

लेखमालेचा पहिला भाग : https://amrutmaharashtra.org/news.php?id=261
लेखमालेचा दुसरा भाग : https://amrutmaharashtra.org/news.php?id=285
......
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. जास्तीत जास्त उद्योजक उभे करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारची विविध कार्ये ही संस्था करत असून, संस्थेच्या अनेक योजना आहेत. संस्थेच्या योजनांची अधिक माहिती https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 12:35 PM News publication time | Views: 583 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 12:35 PM News publication time | Views: 583 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words