अमृतपेठ हा किफायतशीर प्लॅटफॉर्म वापरायचा कसा?

विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठी 'स्टेप बाय स्टेप' मार्गदर्शन; लेखमालेचा दुसरा भाग

अमृतपेठ हा किफायतशीर प्लॅटफॉर्म वापरायचा कसा? मुख्य फोटो
मुख्य फोटो

राज्यातील लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर जगभर पोहोचवण्यासाठी अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अलीकडेच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. अमृतपेठ या प्लॅटफॉर्मविषयी अधिक माहिती देणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग...

आपल्याला ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणे जमेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो; पण अमृतपेठ वापरणे खूपच सोपे आहे. मोबाइल ज्यांना वापरता येतो, त्यांना अमृतपेठ नक्की वापरता येईल, इतका तो सोपा आहे. https://www.amrutpeth.com/ हे अमृतपेठचे संकेतस्थळ आहे.

अमृतपेठमध्ये दोन प्रकारची नोंदणी (Registration) करता येते - ग्राहक (Customer) म्हणून आणि विक्रेता (Seller) म्हणून. या दोन्ही पद्धती अगदी समजून घेऊ या.

विक्रेता म्हणून अमृतपेठचा वापर कसा करायचा?
तुम्ही छोट्या पातळीवर उत्पादन करणारे उत्पादक, स्वयंसहायता समूह किंवा लघुउद्योजक असाल, तर Become a Seller हा पर्याय तुमच्यासाठी आहे.
विक्रेता नोंदणी (Seller Registration) कशी करायची?
अमृतपेठ संकेतस्थळावर गेल्यावर Become a Seller या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर खालील माहिती भरा -
- तुमचे नाव
- ई-मेल आयडी
- पासवर्ड
- दुकानाचे नाव (Shop Name)
- Seller Type – Product / Service (सेवा देता की उत्पादनांची विक्री करता?)
- पत्ता (Address)
- Referral Code (असल्यास)
- सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा

ई-मेल पडताळणी (Email Verification) का आणि कशी?

Submit केल्यानंतर :
- तुमच्या ई-मेलवर एक व्हेरिफिकेशन लिंक (verification link) येईल.
- त्या लिंकवर क्लिक करा.
- ई-मेल पडताळणी झाल्यावर तुमची नोंदणी पूर्ण होते.
- यामुळे सिस्टीममध्ये विश्वास आणि सुरक्षितता राहते.

विक्रेत्यांच्या डॅशबोर्डमध्ये (Seller Dashboard) काय मिळते?
- ई-मेल पडताळणी झाल्यानंतर तुम्ही Seller Dashboardवर जाल. तिथे तुम्ही -
- तुमची प्रॉडक्ट्स आणि कॅटेगरीज पाहू शकता.
- आलेल्या एकूण ऑर्डर्स बघू शकता.
-ऑर्डर्स प्रोसेस/डिस्पॅच करू शकता
- विक्री किती झाली आहे हे ट्रॅक करू शकता.

हे सगळे एकाच ठिकाणी, अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.

ग्राहक म्हणून अमृतपेठचा वापर कसा करायचा?
तुम्हाला अस्सल, स्थानिक उत्पादने खरेदी करायची असतील, तर ग्राहक म्हणून नोंदणी (Customer Registration) करा.
Customer Registration कसे करायचे?
- अमृतपेठ वेबसाइट उघडा. (https://amrutpeth.com/)
- तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर थेट कस्टमर लॉगिन (Customer Login) या पर्यायवर क्लिक करा.
- तुम्ही नवीन युझर असाल, तर Customer Registration करून पुढे लॉगिन करू शकता.
- नोंदणी करताना खालील माहिती भरा -
- पूर्ण नाव
- ई-मेल आयडी
- पासवर्ड
- Submit पर्यायावर क्लिक करा.

एवढे केल्यावर नोंदणी पूर्ण होते.

ग्राहक म्हणून लॉगिन (Customer Login) कसे करायचे?
- Customer Login टॅबवर क्लिक करा.
- तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाका.
- लॉगिन करा.

- यानंतर तुम्ही ग्राहक म्हणून लॉगिन व्हाल.

ग्राहक म्हणून तुम्ही काय करू शकता?
लॉगिन झाल्यावर तुम्ही -
- वेगवेगळ्या कॅटेगरीजमधील प्रॉडक्ट्स बघू शकता.
- आवडलेले प्रॉडक्ट आपल्या कार्टमध्ये घेऊ शकता.
- आपल्याला आवश्यक तेवढी क्वांटिटी निवडू शकता.
- आपला पत्ता नीट भरल्यावर ऑर्डर नोंदवू (Order place) शकता.
- ऑर्डर नोंदवल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉडक्टची घरपोच डिलिव्हरी मिळते. त्यासाठी दुकानात फिरण्याची गरज नाही — सगळे एका ठिकाणी.

शेवटी थोडक्यात सांगायचे, तर अमृतपेठ म्हणजे
- ग्राहकांसाठी घरबसल्या दर्जेदार उत्पादने मिळवण्याचा सोपा मार्ग
- विक्रेत्यांसाठी स्वतःचा व्यवसाय ऑनलाइन माध्यमात नेऊन जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी.

अमृतपेठ वापरण्यासाठी या संदर्भातील कुठलाही पूर्वानुभव लागत नाही. तुमच्याकडे हवी व्यवसाय वाढवण्याची इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि मोबाइल... मग अमृतपेठ तुमची स्थानिक उत्पादने डिजिटल माध्यमातून घेऊन जाईल जागतिक पातळीवर...
.........
(अधिक माहिती लेखमालेच्या तिसऱ्या भागात)

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी मांडलेली भूमिका वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=133

अमृतपेठ उपक्रमाविषयी अधिक वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=160

अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com

अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)

लेखमालेचा पहिला भाग : https://amrutmaharashtra.org/news.php?id=261
......
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. जास्तीत जास्त उद्योजक उभे करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारची विविध कार्ये ही संस्था करत असून, संस्थेच्या अनेक योजना आहेत. संस्थेच्या योजनांची अधिक माहिती https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 05:47 PM News publication time | Views: 308 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 27-12-2025 News publication date | Time: 05:47 PM News publication time | Views: 308 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words