गावागावांत, वस्त्यावस्त्यांत महिलांनी सुरू केलेल्या लघुउद्योगांतील उत्पादने गुणवत्तापूर्ण असतात आणि त्या प्रामाणिकपणाने हे उद्योग चालवत असतात; पण बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनेक अडथळ्यांनी भरलेला असतो. या पार्श्वभूमीवर, अमृतपेठ हा केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म न राहता, एक सामाजिक उपक्रम म्हणून पुढे येत आहे.
उद्योगम् पुरुषलक्षणम् अर्थात उद्योग हेच माणसाचे खरे लक्षण आहे, असे म्हटले जाते. आज आपल्या समाजात असे असंख्य कष्टकरी हात आहेत, जे दर्जेदार उत्पादने तयार करतात; मात्र त्यांची मेहनत योग्य ठिकाणी पोहोचतेच असे नाही. गावागावांत, वस्त्यावस्त्यांत महिलांनी सुरू केलेल्या लघुउद्योगांतील उत्पादने गुणवत्तापूर्ण असतात आणि त्या प्रामाणिकपणाने हे उद्योग चालवत असतात; पण बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अनेक अडथळ्यांनी भरलेला असतो. या पार्श्वभूमीवर, अमृतपेठ हा केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म न राहता, एक सामाजिक उपक्रम म्हणून पुढे येत आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली अमृतपेठ ही डिजिटल बाजारपेठ विशेषतः समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या लघुउद्योगांना केंद्रस्थानी ठेवते. मध्यस्थांमुळे कमी होणारा नफा, मर्यादित बाजारपेठ आणि या घटकांसाठी डिजिटल साधनांचा असलेला अभाव या सगळ्या अडचणींवर अमृतपेठ एकत्रित उत्तर देते. अमृतपेठच्या माध्यमातून विक्रेते आणि ग्राहक थेट जोडले जातात. यामुळे विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दर मिळतो, तर ग्राहकांना थेट स्रोताकडून दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने मिळतात. विक्री हा केवळ व्यवहार न राहता, विश्वासावर आधारित नातेसंबंध निर्माण होतात.
या प्लॅटफॉर्मवर महिलांना उत्पादने नोंदवणे, ऑर्डर व्यवस्थापन, मालाच्या उपलब्ध साठ्याचे नियंत्रण यासाठी सोपा व सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. तांत्रिक ज्ञान मर्यादित असले तरी आत्मविश्वासाने त्याचा वापर करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
अमृत संस्थेने भारतीय टपाल खात्याशी केलेल्या करारामुळे कुरिअर खर्च अत्यंत किफायतशीर झाला आहे. तसेच, वन-वे कॉस्ट धोरणामुळे उत्पादन परत आल्यास ( Return policy) विक्रेत्यावर आर्थिक भार पडत नाही. उत्पादकाला फक्त माल पाठवण्याचा तेवढाच खर्च द्यावा लागतो. परंतु माल खरेदीदाराला न आवडल्यामुळे परत पाठवला गेला, तर त्याचा खर्च उत्पादकाला करावा लागत नाही.
देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीची सुविधाही उपलब्ध असून, एका दिवसात ३५ किलो वजनाची १०० पार्सल्स परदेशात पाठवणे अमृतपेठच्या माध्यमातून शक्य आहे. पुण्यात १९ डिसेंबरला झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात विजय जोशी, स्किलेट्झ फाउंडेशनच्या डॉ. मिताली मोरे, सौ. सुजाता मेंगाणे, तसेच प्रज्ञा रोडे आणि सौ. सविता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना अमृतपेठ या प्लॅटफॉर्मच्या वापराचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे ७५ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
स्वतःच्या कर्तृत्वातूनच माणूस यश मिळवतो. अमृतपेठ ही त्या यशाकडे नेणारी वाट आहे — जिथे महिलांचे कष्ट, कौशल्य आणि आत्मविश्वास या गोष्टी एकत्र येतात.
.........
तुम्हालाही तुमची उत्पादने अमृतपेठ या आपल्या हक्काच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ठेवून राज्यात, देशात आणि जगभर पोहोचवायची आहेत का? मग अमृतपेठवर नक्की नोंदणी करा.
अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com
अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)
......
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. जास्तीत जास्त उद्योजक उभे करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारची विविध कार्ये ही संस्था करत असून, संस्थेच्या अनेक योजना आहेत. संस्थेच्या योजनांची अधिक माहिती https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment