अमृतपेठ कोणासाठी उपयुक्त आहे?

लोकल उत्पादने ग्लोबल पातळीवर नेणारा डिजिटल प्लॅटफॉर्म; लेखमालेचा पहिला भाग

अमृतपेठ कोणासाठी उपयुक्त आहे? मुख्य फोटो
अमृतपेठ कोणासाठी उपयुक्त आहे? अतिरिक्त फोटो

राज्यातील लघुउद्योजकांना त्यांची उत्पादने केवळ राज्यात आणि देशातच नव्हे, तर जगभर पोहोचवण्यासाठी अमृतपेठ हा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अलीकडेच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मचे अलीकडेच त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. अमृतपेठ या प्लॅटफॉर्मविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या. त्याविषयीच्या लेखमालेचा हा पहिला भाग...
.....
अनेक लघुउद्योजक मेहनत करतात; पण त्यांच्या कष्टाचं योग्य मूल्य मिळत नाही. बऱ्याचदा त्याचे कारण असते, की योग्य बाजारपेठ न मिळणे. या समस्येवर उत्तर म्हणून अमृतपेठ (amrutpeth.com) हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

अमृतपेठ कोणासाठी आहे?
- स्थानिक उत्पादक
- जे स्वतःच्या शेतात, घरी किंवा छोट्या युनिटमध्ये उत्पादने तयार करतात (उदा. शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ, घरगुती खाद्यपदार्थ, इत्यादी)
- स्वयंसहाय्यता गट
- महिलांनी तयार केलेले पापड, लोणची, मसाले, हस्तकला वस्तू
- लघुउद्योजक आणि छोटे दुकानदार, ज्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन माध्यमातून वाढवायचा आहे; पण सुरुवात कशी करायची ते कळत नाही.
- सर्वसामान्य ग्राहक, ज्यांना अस्सल, स्थानिक, दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादने थेट उत्पादकांकडून घ्यायची आहेत.

अमृतपेठ गरजेची आहे. कारण अमृतपेठ
- मध्यस्थ कमी करते
- थेट विक्रीची संधी देते
- स्थानिक व्यवसायांना ओळख मिळवून देते

अमृतपेठ म्हणजे स्थानिक नागरिकांसाठी, स्थानिक व्यवसाय वाढवणारे डिजिटल व्यासपीठ. तसेच, स्थानिक पातळीवरील उत्पादने राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि अगदी परदेशातही ज्यांना पाठवायची आहेत, त्यांच्यासाठी उपयुक्त असलेले असे हे व्यासपीठ आहे.

(अधिक माहिती लेखमालेच्या दुसऱ्या भागात)

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी मांडलेली भूमिका वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=133

अमृतपेठ उपक्रमाविषयी अधिक वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=160

अमृतपेठवर ऑनबोर्डिंगसाठी : www.amrutpeth.com

अमृतपेठच्या अधिक माहितीसाठी संपर्क : 9112226154 (कार्यालयीन वेळेत)
......
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करते. जास्तीत जास्त उद्योजक उभे करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारची विविध कार्ये ही संस्था करत असून, संस्थेच्या अनेक योजना आहेत. संस्थेच्या योजनांची अधिक माहिती https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 03:16 PM News publication time | Views: 414 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Siddhesh Keskar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 03:16 PM News publication time | Views: 414 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words