अमृत संस्थेकडून निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षण घ्या आणि उद्योजक व्हा!

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना सुवर्णसंधी; कौशल्य मिळवा आणि नोकऱ्या देणारे व्हा

अमृत संस्थेकडून निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षण घ्या आणि उद्योजक व्हा! मुख्य फोटो
अमृत संस्थेकडून निःशुल्क व्यावसायिक प्रशिक्षण घ्या आणि उद्योजक व्हा! अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, समाजातून उद्योजक घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. याच उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) राबवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना व्यवसाय नियोजन, भांडवल उभारणी, शासकीय योजना व अनुदाने, कर्जसुविधा, मार्केटिंग, व्यवस्थापन कौशल्य तसेच प्रत्यक्ष उद्योगसंधी याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषिपूरक व्यवसाय, ट्रेडिंग तसेच स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क आहे.

अमृत कौशल्य उद्यम वर्धन - लघुउद्योग प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, योग्य कच्चा माल उपलब्धता, तयार मालाची विक्री, बाजारपेठेचा शोध, ब्रँडिंग व ट्रेडमार्क, नफा–तोटा मोजणी, आर्थिक नियोजन, उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे, तसेच अमृतपेठ या डिजिटल माध्यमातून विक्री कशी करावी, याची सविस्तर माहिती यामध्ये दिली जाणार आहे.

अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार या समाजघटकांतील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या नागरिकांना घेता येणार आहे.

हा उद्योजकता विकास कार्यक्रम रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक घडवण्यास मदत करील. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अमृत संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्कर रोडे - 94032 00606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत 

रामेश्वर साळुंके - 80100 95930

अमृतमित्र

मंजू कुलकर्णी - 94045 93726

अमृतसखी 

ऋचा शर्मा - 77090 80073

अमृतसखी 

पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, 

पुंडलिकनगर रोड, सेक्टर -४ सिडको, 

हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 09:11 PM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 09:11 PM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words