सामाजिक कार्य आणि यशस्वी उद्योजकतेचा संगम असलेल्या सौ. मेधा कुळकर्णींचा 'अमृत'तर्फे गौरव

रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि ब्युटी केअर क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका

सामाजिक कार्य आणि यशस्वी उद्योजकतेचा संगम असलेल्या सौ. मेधा कुळकर्णींचा 'अमृत'तर्फे गौरव मुख्य फोटो
सामाजिक कार्य आणि यशस्वी उद्योजकतेचा संगम असलेल्या सौ. मेधा कुळकर्णींचा 'अमृत'तर्फे गौरव अतिरिक्त फोटो

रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांचा गौरव करण्यात आला. अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये यांनी सौ. कुळकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. लोकप्रतिनिधी म्हणून समाजहितासाठी त्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन कृतज्ञतेच्या भावनेतून हा सन्मान करण्यात आला.

अगदी घरगुती वातावरणात झालेल्या या अनौपचारिक सोहळ्यावेळी अवधूत मुळ्ये यांनी सौ. कुळकर्णी यांना अमृत संस्थेने तयार केलेली वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका भेट म्हणून दिली. हिंदू वर्ष, तिथी, सण-उत्सवांसह अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम व शासकीय माहितीचा समावेश असलेली ही दिनदर्शिका सर्वसामान्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

या सत्काराप्रति कृतज्ञता व्यक्त करताना सौ. मेधा कुळकर्णी यांनी आपण अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाला माझे मनापासून सहकार्य लाभेल. संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ माझ्या ज्ञातिबांधवांनी, तसेच लक्ष्यित गटातील प्रत्येक घटकाने घ्यावा, असे मी आवर्जून आवाहन करते.'

अमृत संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा प्रभावी प्रसार होत असून, लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे या योजना अधिक व्यापक स्वरूपात समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत.

यशस्वी व्यावसायिक महिला म्हणून सौ. मेधा कुळकर्णी यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. रत्नागिरीतील एक प्रसिद्ध, विश्वसनीय आणि सन्माननीय नाव म्हणून सौ. मेधा कुळकर्णी यांच्या ‘आर्या ब्युटी केअर’कडे पाहिले जाते. सर्वांशी आपुलकीने व प्रेमाने वागणाऱ्या मेधाताईंनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर ही ओळख निर्माण केली आहे. अमृत संस्थेला या क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवाची व कौशल्याची गरज भासेल, तेव्हा आपण सदैव सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Avadhoot Mulye News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 433 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Avadhoot Mulye News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 433 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words