अमृत दिनदर्शिकेचे नंदुरबारमध्ये स्वागत

विविध स्तरांतील नागरिकांना दिनदर्शिका वितरित

अमृत दिनदर्शिकेचे नंदुरबारमध्ये स्वागत मुख्य फोटो
अमृत दिनदर्शिकेचे नंदुरबारमध्ये स्वागत अतिरिक्त फोटो

नंदुरबार : अमृत ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात या अमृत दिनदर्शिकेचे वाटप करण्यात येत आहे. शासकीय अधिकारी, तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना अमृत संस्थेबद्दल माहिती देण्यात येत आहे. संस्थेकडून नावीन्यपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या डोळ्यांसमोर राहण्यासाठी अमृत दिनदर्शिका उपयुक्त ठरत आहे. या दिनदर्शिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

अमृत संस्थेविषयी 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 10:21 PM News publication time | Views: 530 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news
Publisher: Yogesh Ahire News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 10:21 PM News publication time | Views: 530 Number of times this news has been viewed | District: nandurbar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words