उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास दाखल्याची चिंता सोडा! योग्य अर्जानंतर तातडीने मिळणार कागदपत्रे

अमृत संस्थेच्या योजनांच्या इच्छुक लाभार्थ्यांसाठी कन्नड तालुक्याच्या नायब तहसीलदारांनी दिली ग्वाही

उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास दाखल्याची चिंता सोडा! योग्य अर्जानंतर तातडीने मिळणार कागदपत्रे मुख्य फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास दाखल्याची चिंता सोडा! योग्य अर्जानंतर तातडीने मिळणार कागदपत्रे अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रामुख्याने उत्पन्न प्रमाणपत्र आणि वय व अधिवास दाखला ही कागदपत्रे लागतात. इच्छुक लाभार्थ्यांनी या कागदपत्रांसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून थेट संपर्क साधल्यास ती कागदपत्रे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्याचे नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार असून, त्यांना लवकरात लवकर अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजनांचा कन्नड तालुक्यात प्रभावी प्रचार व प्रसार करण्यात आला. अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी कन्नड तालुक्यातील विविध घटकांच्या भेटी घेऊन अमृत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच अमृत संस्थेची उपयुक्त दिनदर्शिका भेट स्वरूपात त्यांना वितरित केली.

या दौऱ्याची सुरुवात कन्नड शहरातील पुरोहित संघाच्या सचिवांच्या भेटीने झाली. त्यांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देऊन दिनदर्शिका भेट देण्यात आली. त्यानंतर अमृत लक्ष्यित गटातील शहरातील विविध व्यापाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांनाही दिनदर्शिका देण्यात आली व अमृत संस्थेच्या योजनांबाबत त्यांचा सकारात्मक सहभाग व प्रतिसाद जाणून घेण्यात आला.

यानंतर शहरातील सरस्वती क्लासेसचे संचालक श्री. मांडे यांची भेट घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांनाही अमृतची दिनदर्शिका देऊन योजनांची माहिती देण्यात आली.

कन्नड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. त्यांना अमृतची दिनदर्शिका देऊन विविध योजनांची माहिती देण्यात आली. माहिती ऐकल्यानंतर श्री. सोनवणे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन अमृतच्या लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांसाठी प्रशासन स्तरावर संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी वाघमारे यांचा परिचय करून देऊन, अमृतच्या लाभार्थ्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर थेट संपर्क साधल्यास ती कागदपत्रे तत्परतेने व लवकरात लवकर करून देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

या प्रसंगी दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी सुरेश चव्हाण यांचा परिचय करून देण्यात आला. अमृत संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी व व्यापक प्रचार देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.

यानंतर कन्नड येथील उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार श्री. बहुरे यांची भेट घेण्यात आली. त्यांनाही अमृतची दिनदर्शिका भेट देऊन योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी निखिल अग्रवाल उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 08:26 PM News publication time | Views: 464 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Yogesh Rode News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 08:26 PM News publication time | Views: 464 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words