लातूरमध्ये अमृत संस्थेच्या योजनांबद्दलही जागृती
लातूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यात आली. विभागीय सल्लागार संदीप मराठे, जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी सर्व योजना सांगितल्या. अमृत संस्थेची दिनदर्शिका त्यांना भेट म्हणून देण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांनी दिनदर्शिकेचे विशेष कौतुक केले.
अमृत संस्थेची दिनदर्शिका संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, सध्या तिचे वितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. या दिनदर्शिकेमुळे लक्ष्यित घटकांतील नागरिकांना योजना समजून घेण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम सुहासराव मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,
विद्यानगर, लातूर.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment