लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांना देण्यात आली अमृत संस्थेची माहिती

योजनांविषयी झाली चर्चा

लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांना देण्यात आली अमृत संस्थेची माहिती मुख्य फोटो
लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांना देण्यात आली अमृत संस्थेची माहिती अतिरिक्त फोटो

लातूर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्य करते. या संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांना देण्यात आली. अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी खडके यांची भेट घेऊन त्यांच्याशी याविषयी चर्चा केली. लातूर येथे लवकरच संस्थेच्या लक्ष्यित घटकांसाठी अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याची माहितीही त्यांना देण्यात आली. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या अमृत दिनदर्शिकेची माहिती देऊन श्री. खडके यांना दिनदर्शिकाही देण्यात आली. या वेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी दीपक गायकवाडही उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :
शुभम सुहासराव मुळजकर - 7391065470
लातूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत संस्थेचे लातूर जिल्हा कार्यालय,
पहिला मजला, पितृछाया बिल्डिंग,
मयुरेश्वर अपार्टमेंट, सिग्नल कॅम्प,
विद्यानगर, लातूर.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 01:25 AM News publication time | Views: 1,026 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 04-01-2026 News publication date | Time: 01:25 AM News publication time | Views: 1,026 Number of times this news has been viewed | District: latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words