शहादा तालुक्यातील जावदा येथे होणार आयोजन
नंदुरबार : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे नंदुरबार जिल्ह्यात लवकरच लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी शेतीविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे. या लक्ष्यित गटातील घटकांसाठी संस्था शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा, प्रोत्साहन अर्थसाह्य, उद्योजकांकरिता योजना, अमृत कौशल्यविकास उपक्रमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असतात.
अमृत संस्थेच्या नंदुरबार जिल्हा कार्यालयाकडून अतिदुर्गम शहादा तालुक्यातील जावदा या गावी लक्ष्यित गटातील नागरिकांची भेट घेण्यात आली. त्यांना अमृत संस्थेच्या योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांना शेतीविषयक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांबद्दल सांगण्यात आले. त्या नागरिकांनी सेंद्रिय शेती करण्याबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. लवकरच संस्थेकडून त्यांच्यासाठी शेतीविषयक विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment