खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुवर्णसंधी
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने जालना जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात लवकरच कौशल्याधारित व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत फॅशन डिझायनिंग, तसेच स्थानिक पातळीवरील संधींवर आधारित विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये संबंधित व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू करू शकतील, असा विश्वास अमृत संस्थेने व्यक्त केला आहे.
अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, संस्थेच्या लक्ष्यित गटातील पात्र युवक-युवतींसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. जालना जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (TC)/निर्गम/ जातीचा सक्षम पुरावा, उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी), अधिवास प्रमाणपत्र.
संपर्क व पत्ता :
अमृत जिल्हा कार्यालय,
दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
नितीन खेकाळे - 7391065474, 9130283058
जालना जिल्हा व्यवस्थापक, अमृत
चिंतेश जोशी - 9421944752
जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
सत्यम अग्रवाल - 9881086777
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/
Comments 7 Comments
Madhuri r joshi
I'm interested to learn
Anjali Nagori
Yes I am interested
Write a Comment