लातूर येथे नरेंद्र बोरा यांच्याशी संवाद; अमृतच्या योजनांची दिली माहिती

मारवाडी समाजातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बोरा यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली.

लातूर येथे नरेंद्र बोरा यांच्याशी संवाद; अमृतच्या योजनांची दिली माहिती मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : मारवाडी समाजातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बोरा यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी युवक व उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) तसेच अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार व उद्योगाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समाजातील युवक व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक संधी मिळाल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नरेंद्र बोरा यांनी अमृतच्या योजनांची माहिती जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर व अमृत मित्र अमित पांडे उपस्थित होते.


अधिक माहितीसाठी संपर्क :-शुभम मुळजकर

जिल्हा व्यवस्थापक,लातूर

अमृत कार्यालय,लातूर

संपर्क क्रमांक- 7391065470

पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,

सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका,

जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: आमित पांडे News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: आमित पांडे News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 02:44 PM News publication time | Views: 14 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement