अमृत संस्थेने अल्पावधीत केलेले कार्य उल्लेखनीय

'अमृत'च्या योजनांची माहिती देणाऱ्या दिनदर्शिकेच्या वितरणावेळी नाशिकमध्ये अधिकाऱ्यांनी केले कौतुक

अमृत संस्थेने अल्पावधीत केलेले कार्य उल्लेखनीय मुख्य फोटो
मुख्य फोटो

नाशिक : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अल्प कालावधीत केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार नाशिकमधील अधिकाऱ्यांनी काढले. संस्थेच्या योजना आणि उपक्रम स्त्युत्य असल्याचे सांगतानाच त्यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. विविध योजनांची माहिती देण्याकरिता अमृत संस्थेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे विविध अधिकारी आणि मान्यवरांना नववर्षदिनी वितरण करण्यात आले. त्या वेळी ही भावना व्यक्त झाली. लक्ष्यित गटातील प्रत्येक समाजबांधवांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील विविध सरकारी अधिकाऱ्यांना अमृत दिनदर्शिकेचे वितरण नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी आणि अमृतमित्र यांनी केले. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिनदर्शिका उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक दीपक चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी विलास बोडके, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक पल्लवी मोरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन सहायक आयुक्त विजय रिसे, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे अधिकारी अमित डेरे, विठ्ठल पाटील, तुषार शेरेकर या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दिनदर्शिका वितरित करण्यात आली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 07:11 PM News publication time | Views: 165 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words