जिंतूरमध्ये अमृत संस्थेतर्फे चार जानेवारीपासून फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण

शिवणकामापासून व्यवसायापर्यंतच्या प्रशिक्षणाचाही समावेश

जिंतूरमध्ये अमृत संस्थेतर्फे चार जानेवारीपासून फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण मुख्य फोटो
जिंतूरमध्ये अमृत संस्थेतर्फे चार जानेवारीपासून फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण अतिरिक्त फोटो

जिंतूर (जि. परभणी) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे जिंतूरमध्ये चार जानेवारी २०२६पासून फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहे. तो १० फेब्रुवारी २०२६पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी महिलांना फॅब्रिकची ओळख, मानवी आकृती ड्रॉइंग, शरीराचे मोजमाप घेण्याची पद्धत, कपड्यांचे कटिंग तंत्र, रंगसंगती, स्केचिंग, शिवणकाम, अ‍ॅक्सेसरीज डिझायनिंग यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.

याबरोबरच प्रशिक्षणार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया, पॅटर्न मेकिंग, फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, बाजारपेठेतील मागणी, खर्च नियोजन, नफा व्यवस्थापन, तसेच स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या कसा उभारावा व तो कसा टिकवावा याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत संस्थेच्या माध्यमातून आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संधीचा लक्ष्यित गटातील महिला, युवक-युवतींनी जास्तीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.

प्रशिक्षणस्थळ :
भाग्यवंत गारमेंट, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल परिसर,
कसबा पेठ, जिंतूर

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी.
मोबाइल : 7391065473

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 01-01-2026 News publication date | Time: 03:19 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words