सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून अमृतच्या योजना नागरिकांपर्यंत,लातूरात विविध समाजघटकांशी थेट संवाद; शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन

समाजातील पात्र व गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि विकासाच्या संधी पोहोचविण्याच्या उद्देशाने *महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या माध्यमातून *‘सेवा संकल्प अभियान २०२६’* राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर येथे विविध समाजघटकांशी संवाद साधून अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून अमृतच्या योजना नागरिकांपर्यंत,लातूरात विविध समाजघटकांशी थेट संवाद; शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन मुख्य फोटो
सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून अमृतच्या योजना नागरिकांपर्यंत,लातूरात विविध समाजघटकांशी थेट संवाद; शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

*लातूर, दि. २१ सप्टेंबर :* समाजातील पात्र व गरजू घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि विकासाच्या संधी पोहोचविण्याच्या उद्देशाने *महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या माध्यमातून *‘सेवा संकल्प अभियान २०२६’* राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर येथे विविध समाजघटकांशी संवाद साधून अमृतच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

*अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनात* सुरू असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नागरिकांच्या गरजा, अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यावर भर देण्यात येत आहे. *मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने* लातूरमध्ये अभियानाला व्यापक स्वरूप देण्यात आले.

‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून *शिक्षण, कौशल्यविकास, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि संशोधन* या क्षेत्रांतील उपलब्ध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि उपलब्ध प्रशिक्षणाच्या संधींबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.

विशेषतः *कोमटी, मारवाडी, ब्राह्मण, पटेल, हिंदू राजपूत, सिंधी, गुजराती, लिंगायत* यांसह एकूण *२६ जातींच्या समावेशासंदर्भातील योजनांची माहिती* संबंधित समाजघटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. विद्यार्थी, युवक, महिला, नवउद्योजक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून *‘माहितीपासून लाभापर्यंत’* ही संकल्पना पुढे नेण्यात येत असून, केवळ योजनांची माहिती देण्याऐवजी पात्र नागरिकांना योग्य योजना समजून घेणे, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आणि उपलब्ध संधींचा लाभ घेणे यासाठी मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येत आहे.

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ हे शासनाच्या योजना आणि समाजातील पात्र लाभार्थी यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

*अमृतच्या योजनांची माहिती जाणून घेऊन पात्र नागरिकांनी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा,* असे आवाहन अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 06:10 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: chintesh joshi News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 06:10 PM News publication time | Views: 21 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement