सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत पेठ’चा डंका वाजणार! माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सर यांच्या उपस्थितीत BBNA टीमसोबत महत्त्वपूर्ण चर्चा !
सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी सर सोलापूर दौऱ्यावर आले असता, BBNA चे श्री. तमनवार सर, श्री. कामतकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकता विकास आणि स्थानिक उत्पादनांच्या विपणनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
या बैठकीत मुख्यत्वे ‘अमृत पेठ’ आणि ‘अमृत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’ या उपक्रमांवर सविस्तर व सकारात्मक संवाद झाला. BBNA च्या टीमने माननीय व्यवस्थापकीय संचालकांना विश्वास दिला की, सोलापुरात ‘अमृत पेठ’चे भव्य व अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले जाईल.
तालुक्या-तालुक्यात पोहचणार ‘अमृत पेठ’ सोलापूर शहरासोबतच सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘अमृत पेठ’चा विस्तार कसा करता येईल, यावर बैठकीत विशेष मंथन झाले. स्थानिक उत्पादक, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि अमृत ई-कॉमर्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी BBNA टीमने पुढाकार घेतला आहे.
माननीय विजय जोशी सर यांच्यासोबत झालेली ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असून, यामुळे सोलापूर जिल्ह्यात ‘अमृत पेठ’चा डंका वाजणार आणि स्थानिक उद्योजकतेला नवी दिशा मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment