महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने *‘अमृत संवाद मेळावा – सेवा संकल्प अभियान २०२६’चे आयोजन वीरशैव समाज सांस्कृतिक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे उत्साहात करण्यात आले. **अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश उपाध्यक्ष मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने* आयोजित या मेळाव्यास विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लातूर, दि. २१ सप्टेंबर :* महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था *महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)* यांच्या वतीने *‘अमृत संवाद मेळावा – सेवा संकल्प अभियान २०२६’चे आयोजन वीरशैव समाज सांस्कृतिक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे उत्साहात करण्यात आले. **अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजयजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या प्रदेश उपाध्यक्ष मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने* आयोजित या मेळाव्यास विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमृतच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थी, युवक, महिला, उद्योजक आणि नवउद्योजकांना उपलब्ध असलेल्या संधींबाबत जनजागृती करणे, हा या संवाद मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता.
*मा. श्री. विजयजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून अमृतच्या विविध योजनांची प्रभावी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.* शिक्षण, कौशल्यविकास, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, संशोधन आदी क्षेत्रांतील योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच *मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने* आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात विविध समाजघटकांशी थेट संवाद साधण्यात आला. योजनांची माहिती केवळ कागदोपत्री न राहता ती पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी नागरिकांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यावर भर देण्यात आला.
मेळाव्यात *कोमटी, मारवाडी, ब्राह्मण, पटेल, हिंदू राजपूत, सिंधी, गुजराती, लिंगायत* यांसह एकूण *२६ जातींच्या समावेशासंदर्भातील शासनाच्या विविध योजनांची माहिती* देण्यात आली. विविध घटकांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत उपस्थितांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
अमृतच्या योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक, महिला आणि नवउद्योजकांना कौशल्यविकास व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध संधींची माहिती देण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष संवादातून उत्तरे मिळाल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया समजून घेण्यास उपस्थितांना मदत झाली.
या मेळाव्यास *शैलेशजी लाहोटी, अध्यक्ष – मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था; विक्रमसिंहजी चौहान, माजी नगराध्यक्ष; अमितजी सामंत, विभागीय अधिकारी – मराठवाडा विभाग; विश्वनाथजी निगुडगे, नरेशजी पांड्या, उमाकांतजी कोरे, मधुकरजी कुलकर्णी, नगरसेवक भीमाजी बेंबळकर, प्रवीणजी कस्तुरे, राजाभाऊ राचट्टे, सुनीलजी बच्चेवार, ओमजी धरणे, राहुलजी भुतडा, सुरेशजी जाधव* यांच्यासह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या माध्यमातून अमृतच्या योजना व उपक्रमांची माहिती समाजातील पात्र आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला. **मा. श्री. विजयजी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि मा. डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या सहकार्याने* आयोजित हा संवाद मेळावा नागरिकांमध्ये योजनांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि शासनाच्या उपलब्ध संधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
अधिक माहितीसाठी संपर्क :- शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक, लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट , सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment