‘एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रमातून अदासी येथे राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकीचा जागर

अदासी (जि. गोंदिया) : AMRUT, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने कॉलेज ऑफ फार्मसी व कापसे कनिष्ठ महाविद्यालय, अदासी येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरण संवर्धन, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला ८३ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

‘एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रमातून अदासी येथे राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकीचा जागर मुख्य फोटो
‘एक दिवस राष्ट्रासाठी’ उपक्रमातून अदासी येथे राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकीचा जागर अतिरिक्त फोटो

अदासी : AMRUT, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने कॉलेज ऑफ फार्मसी व कापसे कनिष्ठ महाविद्यालय, अदासी, जि. गोंदिया येथे ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. विश्व बंधुत्व पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय विकास महारवाडे सर यांनी भूषविले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. H. M. कोरे सर यांनी केली. यावेळी AMRUTचे जिल्हा व्यवस्थापक कार्तिक तिवारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजच्या युवा पिढीने कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यासोबतच राष्ट्राप्रती प्रेम, सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची जाणीव आणि सकारात्मक विचारसरणी जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यालयातील एकूण ८३ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने विद्यालय परिसरात सकारात्मक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. ‘अमृतमय गोंदिया जागत आहे’ या संकल्पनेला कृतीची जोड देत AMRUTच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत, असे मत H. M. कोरे सर यांनी व्यक्त केले. वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि विद्यार्थ्यांशी संवादातून राष्ट्रभावनेची जाणीव निर्माण करत ‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश दिला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 04:41 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 04:41 PM News publication time | Views: 17 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement