अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात अद्यगौड समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर शर्मा व कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. आरतीनंतर अमृतच्या योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाबाबत समाजाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) अद्यगौड समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर शर्मा आणि समाजाच्या कार्यकारणी सदस्यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
यावेळी अद्यगौड समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर शर्मा, कार्यकारणी सदस्य लक्ष्मीकांत शर्मा, विजय मिश्रा, सुनील सुरुले, संतोष शर्मा, श्यामसुंदरजी शर्मा, विजय शर्मा यासह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी अध्यक्ष चंद्रशेखर शर्मा यांचे स्वागत केले. तसेच अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि रुचा शर्मा यांनी अद्यगौड समाजाच्या कार्यकारणीचे स्वागत केले.
आरतीनंतर अमृतअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजना, उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती समाजाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment