अमृत संस्थेतर्फे दिग्रसचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. संजय बंग यांचा सत्कार

यशाबद्दल अभिनंदन आणि समाजकार्याबद्दल गौरव

अमृत संस्थेतर्फे दिग्रसचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. संजय बंग यांचा सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

दिग्रस (जि. यवतमाळ) : नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत दिग्रसचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले डॉ. संजय बंग यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. डॉ. संजय बंग यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या पुढील लोकहितकारी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करणारे पत्र संस्थेतर्फे त्यांना देण्यात आले. डॉ. बंग यांनी याबद्दल आभार मानले. या प्रसंगी अमृत संस्थेचे प्रतिनिधी, मान्यवर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. बंग यांनी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त विकासात्मक, प्रशिक्षण व सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्यासाठी अमृत संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लोकप्रतिनिधी म्हणून दिग्रस शहरातील व परिसरातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत सकारात्मक भूमिका त्यांनी व्यक्त केली.

अमृत संस्था ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. लक्ष्यित घटकांच्या उन्नतीसाठी शासनाच्या ध्येयधोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut. org. in/

Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 30-12-2025 News publication date | Time: 01:18 PM News publication time | Views: 69 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words