अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत सक्षम "अंतर्गत उद्योकांसाठी विशेष व्यवसाय मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते
अमृत (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) यांच्या "अमृत सक्षम" उपक्रमांतर्गत इच्छुक उद्योजकांसाठी विशेष व्यवसाय मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील संधींचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुवर्णसंधी यामध्यमातून मिळणार आहे. कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन च्या सौ. वैष्णवी भागवत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरवात भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या सत्रामध्ये कचऱ्यावर आधारित व्यवसायाच्या विविध संधी,व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामकाजाची माहिती देण्यात आली.कचऱ्यातून संधी निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल.विशेषत यामध्ये सुका कचरा प्रक्रिया करून प्लास्टिक पेलेट्स निर्मिती.
-निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती.-RRR Centre – Reduce • Reuse • Recycle -व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल व संसाधने. -यंत्रसामग्री व व्यवसायाची प्राथमिक गरज उत्पादन,विक्री व बाजारपेठेची माहिती -व्यवसाय सुरू करण्याचे महत्त्वाचे टप्पे
-प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.यावेळी 15 पेक्षा जास्त इच्छुक यांनी सहभाग घेतला. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवसस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजना विषयी माहिती दिली. यावेळी अमृत मित्र वैभव कुलकर्णी व अमृत सखी गौरी कुलकर्णी उपस्तित होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी,सेनगुनथर,गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार,हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,
प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment