मोहाडी (जि.भंडारा) तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि तहसील कार्यालय, मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात २९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शासकीय कार्यालयातील विविध विभागांचे प्रत्यक्ष कामकाज, दाखले तयार करण्याची प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन घेतले.

मोहाडी (जि.भंडारा)  तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न मुख्य फोटो
मोहाडी (जि.भंडारा)  तहसील कार्यालयात ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न अतिरिक्त फोटो

ता.मोहाडी, जिल्हा भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आणि तहसील कार्यालय, मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अमृत संवाद सेतू' उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमात २९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शासकीय कार्यालयातील विविध विभागांचे प्रत्यक्ष कामकाज, दाखले तयार करण्याची प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन घेतले.

या उपक्रमात मोहाडी येथील परमवीर चक्र विजेता मेजर धनसिंह थापा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील २० विद्यार्थी तसेच नटवरलाल जशभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयातील ९ विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व श्री. विकास ठवकर सर आणि प्रा. श्री. नरेश आंबिलकर सर यांनी केले.

उपक्रमादरम्यान मा. तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक शाखेचे मा. नायब तहसीलदार श्री. श्रीधर कारेमोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत उपयोगी ठरणाऱ्या विविध दाखल्यांसाठी अर्ज करण्यापासून ते दाखले तयार होण्यापर्यंतची कार्यपद्धती त्यांनी समजावून सांगितली. तसेच तहसील कार्यालयातील आस्थापना, आवक-जावक आणि विविध दाखल्यांशी संबंधित कामकाजाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातील कामकाजाची पद्धत, विविध विभागांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारून कार्यालयीन कामकाजातील विविध बाबी समजून घेतल्या.

स्पर्धा परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्य, योग्य नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे असून, प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश संपादन करता येते, असे श्री. श्रीधर कारेमोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित विभागप्रमुखांकडून कामकाजाची माहिती घेतली. प्रत्यक्ष कार्यालयीन वातावरणात शासकीय कामकाज समजून घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीची अधिक स्पष्ट माहिती मिळाली.

‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्यासोबतच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादाचे महत्त्व, शासकीय सेवांचा योग्य वापर आणि जबाबदार नागरिक म्हणून असलेल्या भूमिकेची जाणीव करून देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमास मा. तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयीन कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी तहसील कार्यालय उपलब्ध करून दिले. याबद्दल अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास यांनी मा. तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे सहर्ष आभार मानले. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ‘अमृत संवाद सेतु’ उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: sakshi joshi News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 05:06 PM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: sakshi joshi News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 05:06 PM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement