छत्रपती संभाजीनगर येथे अमृत संस्थेतर्फे ब्युटी वर्कशॉपचा उत्साहात शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर येथे अमृत संस्थेतर्फे पाच दिवसीय ब्युटी वर्कशॉपला उत्साहात सुरुवात झाली. प्रशिक्षक वनिता शिवाजी शिंदे यांनी मेकअप, स्किन टोननुसार मेकअपची निवड आणि विविध मेकअप पद्धतींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे  अमृत संस्थेतर्फे ब्युटी वर्कशॉपचा उत्साहात शुभारंभ मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगर येथे  अमृत संस्थेतर्फे ब्युटी वर्कशॉपचा उत्साहात शुभारंभ अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : अमृत संस्थेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालय येथे पाच दिवसीय ब्युटी वर्कशॉप प्रशिक्षणाचा शुभारंभ आज उत्साहात करण्यात आला. महिलांना ब्युटी क्षेत्रातील कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाच्या प्रारंभी प्रशिक्षक वनिता शिवाजी शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना मेकअपविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्वचेच्या रंगानुसार योग्य मेकअपची निवड, मेकअपच्या विविध पद्धती, सौंदर्य प्रसाधनांचा योग्य वापर याबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष मेकअप करून दाखवत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

या पाच दिवसीय प्रशिक्षणातून महिलांना ब्युटी क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येणार असून, प्रशिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत सखी मंजु कुलकर्णी आणि रुचा शर्मा यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणार्थी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत  अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 01:20 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 09-09-2026 News publication date | Time: 01:20 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement