सोलापूर जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांच्याकडून 'अमृत'च्या कामाचे कौतुक; श्रेयस कुलकर्णी यांचा सन्मान !
सोलापूर जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांच्याकडून 'अमृत'च्या कामाचे कौतुक; श्रेयस कुलकर्णी यांचा सन्मान
सोलापूर:
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्या वतीने पार पडलेल्या विशेष बैठकीत जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांनी 'अमृत' संस्थेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी सोलापूरचे जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध योजना, उद्देश आणि सामाजिक कार्याची सविस्तर माहिती मॅनेजर जोशी यांना दिली.
श्रेयस कुलकर्णी यांनी मांडलेल्या माहितीमुळे आणि 'अमृत'च्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे प्रभावित होऊन मॅनेजर मकरंद जोशी यांनी संस्थेच्या कामाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी जनता बँकेच्या वतीने श्रेयस कुलकर्णी यांना पुष्पगुच्छ (बुके) देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यावेळी बोलताना म्हणाले, "अमृत संस्था अत्यंत स्तुत्य काम करत असून त्यांच्या योजना समाजातील घटकांसाठी लाभदायक ठरत आहेत. यापुढे बँकेचे कोणतेही काम किंवा तांत्रिक अडचणी असो, जनता बँक नेहमी अमृत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील."
सोलापूर जनता बँकेचे मॅनेजर मकरंद जोशी यांनी 'अमृत' संस्थेच्या उपक्रमांचे व आयोजनाचे मनापासून कौतुक केले. संस्थेची माहिती व योजना जाणून घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत, "आम्ही नेहमी अमृत संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे आश्वासन दिले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment