कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाच्या मराठवाडास्तरीय बैठकीत ‘अमृत’च्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी शैक्षणिक अर्थसहाय्य, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व ‘अमृतपेठ’ आदी योजनांची माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस समाजबांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाच्या बैठकीत ‘अमृत’च्या योजनांची माहिती.
छत्रपती संभाजीनगर : कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट, महाराष्ट्र आणि कान्यकुब्ज ब्राह्मण समाज, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडास्तरीय विशेष सामाजिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. स्टेशन रोड, पदमपुरा येथील जयस्वाल मंगल कार्यालयात रविवारी (६ सप्टेंबर) झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था ‘अमृत’च्या विविध योजनांची माहिती समाजबांधवांना देण्यात आली.
या वेळी ‘अमृत’चे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, ‘अमृत मित्र’ रामेश्वर साळुंखे, ‘अमृत सखी’ रुचा शर्मा व मंजू कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी ‘अमृत’च्या विविध योजनांची माहिती देणारे पोस्टर व माहितीपत्रिकांचे वितरण करण्यात आले.
जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी उपस्थितांना ‘अमृत’च्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये शैक्षणिक अर्थसहाय्य, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन व अर्थसहाय्य, रोजगारक्षम कौशल्य विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, उद्योजकतेसाठीच्या योजना, वैयक्तिक व्याज परतावा योजना तसेच ‘अमृतपेठ’ आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली. सुरू असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथील कान्यकुब्ज समाजाचे प्रमुख विजयजी मिश्रा, निखिलजी तिवारी, अजयजी पांडेय, आशिषजी शुक्ला, सागरजी मिश्रा, पंडित नागेंद्रजी मिश्रा यांच्यासह समाजातील पदाधिकारी, मान्यवर, आयोजक तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विजयजी मिश्रा यांनी ‘अमृत’ संस्थेचे आभार मानले. ‘अमृत’च्या योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू घटकांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त असून, समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अमृतच्या विविध योजनेच्या माहितीसाठी संपर्क:- 7391065475,9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment