कान्यकूब्ज ब्राह्मण समाजाच्या बैठकीत विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेऊन अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जनजागृती व समन्वयाबाबत चर्चा झाली.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विशेष भेट. छत्रपती संभाजीनगर : कान्यकूब्ज ब्राह्मण समाज, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित बैठकीस उपस्थित राहून विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत अमृतच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम व लाभार्थी केंद्रित कार्यक्रमांची माहिती श्री. जी. श्रीकांत यांना देण्यात आली. यावेळी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंखे, अमृत सखी ऋचा शर्मा, मंजू कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क 7391065475,9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment