पुणे जिल्ह्यातील केंदूर येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला 'अमृत वर्ग'

केंदूर: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पह्राडवाडी (केंदूर) येथे नुकताच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात ‘अमृत वर्ग’ संपन्न झाला.

पुणे जिल्ह्यातील  केंदूर येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला 'अमृत वर्ग' मुख्य फोटो
पुणे जिल्ह्यातील  केंदूर येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा झाला 'अमृत वर्ग' अतिरिक्त फोटो

केंदूर: येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पह्राडवाडी (केंदूर) येथे नुकताच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात ‘अमृत वर्ग’ संपन्न झाला.

'आनंददायी शनिवार' या विशेष उपक्रमांतर्गत या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

या अमृत वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना योग, योगासने आणि विविध मैदानी खेळ शिकवण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली.

शारीरिक कसरतींसोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीपर घोषणा घेण्यात आल्या.

वर्गाची सुरुवात आणि सांगता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रार्थना, शांती मंत्र आणि ऊर्जादायी घोषणांनी करण्यात आली.

या संपूर्ण उपक्रमाला शाळेतील शिक्षिका सौ. मनीषाताई साकोरे मॅडम यांचे खूप छान सहकार्य लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी या वर्गाचा आनंद घेतला.

पुढील वर्गाचे नेतृत्व करणार विद्यार्थिनी सई साकोरे‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या अमृत वर्गाची पुढील धुरा विद्यार्थ्यांकडे सोपवण्याचा एक स्तुत्य निर्णय यावेळी घेण्यात आला.

त्यानुसार, पुढील अमृत वर्ग घेण्यासाठी शाळेतील हुशार विद्यार्थिनी सई चंद्रकांत साकोरे हिची निवड करण्यात आली असून, तिला या वर्गाचे नियोजन करण्यासाठी तयार करण्याचे ठरले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना वाव मिळणार असून, इतर विद्यार्थ्यांनाही यातून मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 08-09-2026 News publication date | Time: 09:29 PM News publication time | Views: 33 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement