अमृत संस्थेच्या निःशुल्क डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणामुळे उद्योगाची होतेय प्रगती

फलटणमधील लाभार्थ्याचा अनुभव

अमृत संस्थेच्या निःशुल्क डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणामुळे उद्योगाची होतेय प्रगती मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण (जि. सातारा) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे फलटणमध्ये डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षणाचा निःशुल्क कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन उद्योजक गणेश दयारामणी यांनी डिजिटल मार्केटिंगचे आधुनिक ज्ञान आत्मसात करून आपल्या व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. साईसागर ट्रेडर्स, तसेच श्री गणेश डिस्पोजेबल (पत्रावळीवाले) असे त्यांचे दोन उद्योग असून, त्यांना त्यासाठी या प्रशिक्षणाचा खूप उपयोग होत आहे.

या उपक्रमाअंतर्गत अमृत संस्थेमार्फत उद्योजकांना अमृत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांना आर्थिक बळ मिळणार असून, त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम होणार आहे. 'स्वप्न तुमचं-व्यासपीठ आमचं' या संकल्पनेतून अमृत संस्थेच्या अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उद्योजकांना आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करता येणार आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांना मोठ्या बाजारपेठेशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अमृत संस्था समाजातील तरुण, लघुउद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजक यांना प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ व ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देत असून, अशा उपक्रमांद्वारे रोजगारनिर्मिती, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था भविष्यातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक उद्योजक घडवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 06:39 PM News publication time | Views: 497 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 31-12-2025 News publication date | Time: 06:39 PM News publication time | Views: 497 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words