सोलापूरच्या गिरीधर देशपांडे यांनी मानले 'अमृत'चे आभार १० दिवसांच्या EDP प्रशिक्षणातून घडले नवे उद्योजक !

सोलापूरच्या गिरीधर देशपांडे यांनी मानले 'अमृत'चे आभार १० दिवसांच्या EDP प्रशिक्षणातून घडले नवे उद्योजक !

सोलापूरच्या गिरीधर देशपांडे यांनी मानले 'अमृत'चे आभार १० दिवसांच्या EDP प्रशिक्षणातून घडले नवे उद्योजक ! मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूरच्या गिरीधर देशपांडे यांनी मानले 'अमृत'चे आभार १० दिवसांच्या EDP प्रशिक्षणातून घडले नवे उद्योजक ! सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने आयोजित 'उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम' (EDP) यशस्वीरीत्या पार पडला. या १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा सोलापूर येथील रहिवासी गिरीधर देशपांडे यांनी लाभ घेतला असून, या प्रशिक्षणाद्वारे स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी व तो यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक असणारे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

गिरीधर देशपांडे राहणार: सवेरा सोसायटी, सोनी कॉलेजच्या मागे, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर यांनी अमृत संस्थेमार्फत आयोजित १० दिवसांचे उद्योजकता विकास प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान नवीन व्यवसाय कसा सुरू करावा, बाजारातील मागणीनुसार कोणत्या उद्योगात अधिक नफा (प्रॉफिट) मिळू शकतो, उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग कसे करावे, तसेच व्यवसायाचे आर्थिक व प्रशासकीय नियोजन कसे आखायचे, याविषयी तज्ज्ञांकडून सखोल माहिती व मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना अधिकृत प्रमाणपत्र (Certificate) देऊन सन्मानित करण्यात आले. "अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे मला व्यवसायाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला असून आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे," असे सांगत त्यांनी या उपक्रमाबद्दल अमृत संस्थेचे मनापासून आभार मानले आहेत.

अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय,

१०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला,

यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क:- ९११२२२८७६८



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 25-08-2026 News publication date | Time: 12:26 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement