लातूर अमृत जिल्हा कार्यालयात अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
लातूर, : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या लातूर येथील जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत पाटील, श्री. अविनाश उखंडे व श्री. नागेश लामदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर, जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी आणि मनोज देवणीकर उपस्थित होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी आपल्या असामान्य शौर्य, धाडसी नेतृत्व, प्रभावी युद्धनीती आणि अदम्य आत्मविश्वासाच्या बळावर इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीला धैर्य, नेतृत्व, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या पराक्रमाला अभिवादन केले. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेत तरुणांनी ध्येय निश्चित करून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथेला उजाळा देत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
शुभम मुळजकर
जिल्हा व्यवस्थापक,लातूर
अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment