अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत पराक्रम दिन "संपन्न

अमृत कार्यालय येथे "अपराजीत योद्धे श्रीमंत बाजीराव पेशवे" यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत पराक्रम दिन "संपन्न मुख्य फोटो
अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत पराक्रम दिन "संपन्न अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे आज "अपराजीत योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे" यांच्या ३२६ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रास्ताविक करत अमृत संस्थेच्या सर्व योजना याविषयी सविस्तर माहिती देत बाजीराव पेशवे यांच्या चालू असलेले उपक्रम याविषयी माहिती दिली.

त्याचप्रमाणे बाजीराव पेशवे यांचा अद्वितीय इतिहास नायब तहसीलदार आणि उत्कृष्ट वक्तृत्व असलेले मा.सर्वोत्तम क्षीरसागर यांनी उपस्थितांच्या समोर मांडला.

यावेळी बी.बी.एन चे मा.अमित काळे व अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण संघ युवा प्रदेशाध्यक्ष मा. मंगेश निसळ यांनी देखील बाजीराव पेशवे यांच्या विषयी माहिती दिली.

यावेळी बॉण्ड संघटनेचे मा श्रीपाद फाटक, मा. सचिन फाटक,श्री चिरंजीव प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा स्वप्नील देशमुख,जिल्हा ग्राहक चे मा गजेंद्र क्षीरसागर,सौ.शशिकला क्षीरसागर मॅडम, सौ.रसाळ मॅडम,सौ. सातपुते मॅडम,पत्रकार मा. उदय जोशी,टॅक्स कन्सल्टन्ट मा. अमित डोंगरे, उद्योजक मा सुधीर नगरकर,अमृत मित्र सुजल झुंजारे,अमृत मित्र वैभव कुलकर्णी,अमृत सखी गौरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.


अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार,अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी,सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट,लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 08:56 PM News publication time | Views: 75 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 08:56 PM News publication time | Views: 75 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement