सोलापूर मध्ये बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 'अमृत पराक्रम दिन' उत्साहात साजरा!
सोलापूर मध्ये बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 'अमृत पराक्रम दिन' उत्साहात साजरा! सोलापूर: येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'पराक्रम दिन' अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा नगरसेविका तथा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शोभा नाष्टे, अनुजा कुलकर्णी आणि जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थितांनी बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय शौर्य, युद्धकौशल्य आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण केले. त्यांचे विचार आणि पराक्रम आजच्या युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहतील, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. . हा जयंती सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
अमृत (AMRUT) जिल्हा कार्यालय, १०८-ए, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतिराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१. संपर्क:- ९११२२२८७६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment