पराक्रम, शौर्य आणि नेतृत्वाचा जागर – धुळे येथील जो. रा. सिटी हायस्कूलमध्ये २० ऑगस्टला विशेष व्याख्यान

‘अमृत पराक्रम दिना’ निमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जो. रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पराक्रम, शौर्य आणि नेतृत्वाचा जागर – धुळे येथील  जो. रा. सिटी हायस्कूलमध्ये २० ऑगस्टला विशेष व्याख्यान मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘अमृत पराक्रम दिन’ निमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जो. रा. सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे येथे २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.


या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. चंद्रशेखर बर्वे (डूबेरे, सिन्नर, जि. नाशिक) उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे श्री. बर्वे हे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे मामा मल्हारराव बर्वे यांच्या नवव्या वंशातील वंशज आहेत. त्यामुळे बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्या कुटुंबीय परंपरेतील वंशजाकडून ऐकण्याची अनोखी संधी विद्यार्थ्यांना तसेच इतिहासप्रेमींना मिळणार आहे.


‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे : पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा’ या विषयावर श्री. चंद्रशेखर बर्वे मार्गदर्शन करणार असून, बाजीराव पेशव्यांचे अद्वितीय युद्धकौशल्य, दूरदृष्टी, नेतृत्वगुण, शौर्य आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली जाणार आहे.


अल्पावधीत आपल्या असामान्य रणनितीच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धा म्हणून ओळखले जातात. त्यांचे धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.


विद्यार्थ्यांना इतिहासातील या पराक्रमी व्यक्तिमत्त्वाची ओळख व्हावी, त्यांच्या शौर्याची प्रेरणा मिळावी तसेच युवा पिढीमध्ये स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा, नेतृत्वगुण आणि ध्येयासाठी संघर्ष करण्याची जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.


२० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या व्याख्यानाला विद्यार्थी, शिक्षक आणि इतिहासप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

.अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत जिल्हा कार्यालय धुळे , २६,महाराणा प्रताप कॉलनी,जुने चिरंतन हॉस्पिटल जवळ देवपूर, धुळे संपर्क क्र. – 9112228772 / 9822829555

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 03:57 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 03:57 PM News publication time | Views: 24 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement