अमृत कौशल्य योजनेअंतर्गत अमृत संस्थेच्या रत्नागिरी कार्यालयाकडून आयोजन
रत्नागिरी : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील पंचनदी येथे उद्योजकता परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अमृत कौशल्य उपक्रमांतर्गत हा मेळावा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.
अमृत ही संस्था ब्राह्मण, सारस्वत, पाटीदार, पटेल, गुजराती, रजपूत यांसह एकूण २२ जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा लक्ष्यित गटातील नागरिकांना विविध योजना, कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. अमृत संस्थेमार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार व उद्योजकता विकासाच्या योजना राबवण्यात येतात. या योजनांद्वारे युवकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा दिली जाते.
पंचनदी येथील मेळाव्यात उद्योजकतेची ओळख, स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, तसेच अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. युवक, महिला व नवउद्योजकांसाठी हा मेळावा मार्गदर्शक ठरणार आहे.
या मेळाव्याचा लाभ पंचनदी व परिसरातील पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे रत्नागिरी जिल्हा उपव्यवस्थापक अवधूत मुळ्ये आणि ब्राह्मण संघांचे प्रतिनिधी जगन्नाथ वैशंपायन यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत रत्नागिरी जिल्हा कार्यालय,
प्लॉट नं १७, घर नंबर ७०७/ड ४,
माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पाठीमागे,
हॉटेल सिंधुदुर्गसमोर, साळवी स्टॉप
रत्नागिरी - ४१५६१२
मोबाइल नं : 9112228761
ई-मेल - amrut.ratnagiri.dm@gamil.com
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment