अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP): ९ व्या दिवशी प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम ( EDP): ९ व्या दिवशी प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम (Amrut EDP): ९ व्या दिवशी विविध शासकीय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन! नांदेड: अमृत संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अमृत उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या' (Amrut EDP) नवव्या दिवसाचे प्रशिक्षण अतिशय उत्साही वातावरणात पार पडले.
आजच्या विशेष सत्राचे मार्गदर्शक व प्रशिक्षक श्री. गजानन बच्चेवार यांनी प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगासाठी लागणाऱ्या बँक लोन प्रक्रियेसह उत्पन्न प्रमाणपत्र व डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढावे याची सविस्तर माहिती दिली.
यासोबतच त्यांनी मुद्रा लोन, CMEGP, PMEGP, 'आई' योजना, खादी ग्रामोद्योग आणि आयुष्यमान भारत यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची सखोल माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृतचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर यांनी प्रशिक्षकांचा सत्कार करून प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी केले, तर संपूर्ण नियोजन 'अमृत मित्र' श्री. विश्वास बदापुरकर यांनी सांभाळले.
या सत्रातून मिळालेल्या बहुमूल्य माहितीमुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment