अमृतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'अमृत पराक्रम दिन' निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धेच्या अनुषंगाने परतवाडा येथील गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना निवेदन सादर करण्यात आले.
१८ ऑगस्ट रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत पराक्रम दिन' अंतर्गत दि.१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यासाठी परतवाडा येथील गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धेचा उद्देश, नियमावली, विद्यार्थ्यांचा सहभाग, नोंदणी प्रक्रिया तसेच स्पर्धेद्वारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा आणि राष्ट्रसेवेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी स्पर्धेची संपूर्ण माहिती प्राचार्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेत वक्तृत्व, निबंध लेखन आणि रील्स निर्मिती या तीन प्रकारांचा समावेश असून विद्यार्थ्यांना आपल्या सर्जनशीलतेला व अभिव्यक्तीला वाव मिळणार आहे. या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, संशोधनाची आवड, वक्तृत्वकला, लेखनकौशल्य आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment