सोलापूर येथील संजय सुपेकर यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून आर्थिक साहाय्य

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या *'वैयक्तिक व्याज परतावा योजने'*चा लाभ घेऊन श्री. संजय चिदंबर सुपेकर यांनी आपल्या व्यवसायाचे स्वप्न साकार केले आहे. या योजनेच्या पाठबळामुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) येथे 'पद्मा ज्वेलर्स' (Padma Jewellers) या भव्य सुवर्ण दालनाची यशस्वी स्थापना केली.

सोलापूर येथील संजय सुपेकर यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून आर्थिक साहाय्य  मुख्य फोटो
मुख्य फोटो

सोलापूर मधील अमृत योजनेच्या माध्यमातून 'पद्मा ज्वेलर्स' ची भरभराट! महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेऊन श्री. संजय चिदंबर सुपेकर यांनी आपल्या व्यवसायाचे स्वप्न साकार केले आहे. या योजनेच्या पाठबळामुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) येथे 'पद्मा ज्वेलर्स' (Padma Jewellers) या भव्य सुवर्ण दालनाची यशस्वी स्थापना केली. व्यवसायाचे यश आणि वैशिष्ट्ये ​उत्कृष्ट वाटचाल: अमृत संस्थेचे वेळेवर मिळालेले आर्थिक सहाय्य आणि श्री. संजय सुपेकर यांचे अथक परिश्रम यांच्या जोरावर आज 'पद्माकर ज्वेलर्स'चा व्यवसाय अतिशय उत्तम रीतीने सुरू असून व्यवसायात मोठी भरभराट झाली आहे. विविधता व गुणवत्ता: ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा सोन्या-चांदीच्या दागिन्यांची अतिशय आकर्षक व नवनवीन व्हरायटीज (Designs & Varieties) त्यांच्याकडे उपलब्ध आहे. विश्वासार्ह सेवा: उत्तम दर्जा आणि पारदर्शक व्यवहारांमुळे अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. "अमृत संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेमुळे माझ्या व्यवसायाला नवी दिशा व गती मिळाली. या पाठबळाबद्दल मी अमृत संस्थेचा मनापासून आभारी आहे."अशा श्री.संजय सुपेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२२८७६८


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Arya kulkarni News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 01:02 PM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: Arya kulkarni News publisher name | Date: 06-08-2026 News publication date | Time: 01:02 PM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement