गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत 'उज्ज्वल भवितव्य’घडवणा-या अमृत वर्गाचे आयोजन

गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेमध्ये अनेक नाविन्य पूर्ण उपक्रम पार पडतात , या शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या परीच्या उपक्रमांनी शैक्षणिक व सामाजिक बाबींची शिकवण देत असतात.

गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत 'उज्ज्वल भवितव्य’घडवणा-या अमृत वर्गाचे आयोजन  मुख्य फोटो
गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत 'उज्ज्वल भवितव्य’घडवणा-या अमृत वर्गाचे आयोजन  अतिरिक्त फोटो

गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेमध्ये अनेक नाविन्य पूर्ण उपक्रम पार पडतात , या शाळेतील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या परीच्या उपक्रमांनी शैक्षणिक व सामाजिक बाबींची शिकवण देत असतात.

आता या शाळेमध्ये सामाजिक परिवर्तक असणारा अतिशय उत्कृष्ट उपक्रम हाती घेतला आहे, तो उपक्रम म्हणजे ‘अमृत वर्ग’ . गडचिरोली जिल्ह्याच्या शाळेमध्ये अमृत वर्ग प्रथमतः तुळजाबाई प्राथमिक शाळेमध्ये सुरू झाला, आणि ते आजही नियमित रित्या सुरू आहेत , शाळेतील शिक्षक अमृत वर्ग घेत असतात आणि ते त्या वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवतात. तुळजाबाई प्राथमिक शाळेमध्ये अमृत द्वारे वेगवेगळे सण साजरे झाले, ज्या मधे अमृत आनंद मेळावा, राम नवमी,मराठी भाषा गौरव दिन , अमृत दुर्गोत्सव, इत्यादी. उपक्रमा मध्ये शाळेतील शिक्षक वर्गाचा उत्तम प्रतिसात लाभला . अभ्यासाव्यतिरिक्त इतर खेळ आणि उपक्रमांद्वारे मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी,हाच अमृत वर्गाचा उद्देश आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: वेदांत सुनील मेहता News publisher name | Date: 01-08-2026 News publication date | Time: 03:51 PM News publication time | Views: 79 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement